Tech
21/06/2016
दहीहंडीसाठी थरांची मर्यादा नको, राज्य सरकार जाणार कोर्टात
मुंबई – 21 जून : दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा आणण्यात येऊ नये, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहीहंडीसंबधीचे नियम शिथिल करण्यासाठी सरकार हायकोर्टात गोविंदा मंडळांची बाजू मांडणार आहे. दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा नसावी आणि दहीहंडी फोडताना 12 वर्षीय मुलांना सहभागी होता यावं, यासाठी सरकार कोर्टात बाजू मांडणार आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्रासमोर दहीहंडी आणि गणेशात्सव मंडळांची बाजू मांडली.
दहीहंडी उत्सवात 18 वर्ष वयाची अट पूर्ण करणार्या मुलांनाच सहभागी होता यावं असं मुंबई हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत. तसंच 20 फुटांपेक्षा दहीहंडीची उंची नसावी असे निर्बंध घातले होते. ही अटक शिथिल करुन 12 वर्षांवरील मुलांनी यात सहभागी होऊ द्यावे. तसंच गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकार यांची बाजू मांडून पोलीस आणि महापालिकेने त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. शेलार यांची मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी मूर्तीकारांच्या मंडपांना परवानगी देण्यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना केल्या.
दरम्यान, दहीहंडी फोडताना लहान मुलांचा समावेश करू नये तसंच 20 फुटांपेक्षा अधिक थर लावू नयेत, असे आदेश यापूर्वी मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले होते. या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी कोर्टाने राज्य सरकार आणि दहीहंडी समितीचे अध्यक्ष आशीष शेलार यांना नोटीस बजावली होती.
08/06/2016
अंतराळवीर सुनीता विलीयम्सही झाल्या मोदींच्या फॅन
वॉशिंग्टन : परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते सगळ्यात आधी आर्लिंगटन सिमेट्रीला गेले. त्यानंतर ते अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबिया येथील मेमोरियलमध्ये गेले जेथे मोदींनी मूळ भारतीय वशांची अंतराळवीर सुनीता विलीयम्स आणि तीच्या वडिलांची भेट घेतली.
सुनीता विलीयम्सला जेव्हा भेटीबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की मोदी सर्वात पहिले माझ्या वडिलांना भेटले. मोदींनी आम्हाला भारतात येण्याचे आमंत्रणही दिले. नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत सुनीता या असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. मोदींनी आम्हाला दिलेले निमंत्रण ही आमच्याकरिता सन्मानाची गोष्ट आहे असे विलीयम्सनी सांगितले. त्याचबरोबर अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रात अमेरिका- भारतसोबत काम करायलाही आवडेल अशी इच्छा विलीयम्सनी व्यक्त केली. .
त्याचवेळी आर्लिंगटन सिमेट्री येथे मोदींनी कल्पना चावला यांना श्रद्धांजली व्हायली आणि कल्पनाच्या कुटुंबालाही भेट दिली. तेव्हा सुनीता विलीयम्सने सांगितले की कल्पना चावला या एक महान अंतराळवीर होत्या आणि माझी तिच्यासोबत खूप चांगली मैत्रीही होती.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Nashik
422009