Bestest Part Time Income Opportunity
01/04/2020
#कोरोना_बद्दल_काही_सुरवातीची_काही_माहिती.
#कोव्हीड_१९_च्या_चाचण्यांपासून_मिळणारे_मिळणारे_चुकीचे_म्हणजेच_निगेटिव्ह_येणारे_रिपोर्ट #त्यापासून_होणारा_संभाव्य_धोका_व_त्यामागील_कारणे.
मंडळी, तुम्ही वृत्तपत्रांमध्ये कोविड १९ ची चाचणी दोन तीनदा निगेटिव्ह येऊन शेवटी पॉझिटिव्ह आल्याचं पाहिलं असेल. अगदी बीबीसी आणि चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काहीजणांना विषाणूची लागण झाली असली तरीही सहा वेळा अहवाल निगेटिव्ह आल्याचे म्हटले आहे.
करोना विषाणूबद्दल चिनी सरकारला सर्वप्रथम धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉ. वेनलिंग यांना यामुळेच ओरडा खावा लागला. इतकंच नाही तर संसर्ग झालेल्या पेशंटचा उपचार करताना त्यांना खोकला आणि ताप आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि खूप वेळा चाचणीचा निकाल नकारात्मक आला.
मात्र ३० जानेवारी रोजी डॉक्टरांच्या रक्तात विषाणू असल्याचे निदान झाले
आणि दुर्दैवाने ७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
चुकीचे-निगेटिव्ह चाचणी परिणाम (टेस्ट रिझल्ट), फार समस्याजनक आहेत. कारण या परिस्थितीमध्ये रूग्ण इतरांना घरी, कामावर, शाळेत किंवा समाजात इतरांना संसर्गित करू शकतो. शिवाय उपचाराशिवाय रुग्णाची परिस्थिती देखील बिघडू शकते हे तर आलंच.
कोविड १९ सारख्या अत्यंत संसर्गजन्य, संभाव्य प्राणघातक रोगाचा सामना करताना, अगदी थोड्याशा फॉल्स निगेटिव्हचा मोठ्या लोकसंख्येवर गंभीर आणि व्यापक परिणाम होऊ शकतो.
या कोव्हीड -१९ illness आजारास कारणीभूत व्हायरसचे निदान करण्यासाठी डॉक्टर आरटी-पीसीआर नावाच्या चाचणीचा वापर करतात. आरटी-पीसीआर कोविड १९ च्या विषाणूची जनुकीय सामग्री शोधते आणि त्यावर आधारित निकाल देते. आरटी-पीसीआरचा उपयोग एचआयव्हीचा व्हायरल लोड मोजण्यासाठी केला गेला आहे, तसेच गोवर आणि गालगुंडासारखे इतर आरएनए व्हायरस तपसायला देखील हि चाचणी वापरली जाऊ शकते.
तथापि, कोरोनाव्हायरससाठी आरटी-पीसीआर चाचण्या परिपूर्ण नेहमीच अचूक नसल्याचं आढळलंय. रेडिओलॉजी या आरोग्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माहीतीनुसार चीनमधील हुनान प्रांतातील कोविड -१९ झालेल्या १६७ रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासले गेले. पैकी ३%रूग्णांचे अहवाल सुरूवातीला निगेटिव्ह आल्याचं निदर्शनास आलं.
जरी केवळ 3% चाचण्यांचे परिणाम फॉल्स निगेटिव्ह आले असले तरी यामुळे रोगप्रसार चालू राहून प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो.
कोरोना विषाणूच्या चाचणी १००% बरोबर निकाल का देत नाहीत ?
यामागे बरीच कारणे आहेत.
जर संसर्गाच्या वेळी रुग्णाची तपासणी लवकर झाली आणि विषाणूची कमतरता आढळली, तर चाचणी चुकीचा निगेटिव्ह निकाल देऊ शकते. तसेच रूग्णाकडून घेतला गेलेला नमुना कमी असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्यास किंवा नमुना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने पण समस्या येऊ शकते.
सदोष , खराब गुणवत्ता असलेली रसायने देखील चाचणीचा निकाल चुकीचा निगेटिव्ह करू शकतात. यामुळेच जगभरात आता गुणवत्ता नियंत्रण उपाययोजनांचा वापर करून या रसायनांची निर्मिती केली जात आहे. यावर काही तज्ञांनी फुफ्फुसांचा सीटी स्कॅन करणं हा एक मार्ग सुचवला आहे. पण मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या रोगाची सीटी स्कॅनने चाचणी करणं कितपत शक्य आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यामुळेच बहुतेकवेळा संभाव्य रूग्णाची ठराविक काळाने पुन्हा पुन्हा चाचणी केली जात आहे.
यामुळेच कोविड १९ च्या आजारावर सर्वोत्तम उपाय म्हणजे इतरांपासून अंतर राखणे आणि घराबाहेर न पडणे.
शासनाच्या नियमांचे पालन करूया. करोना विषाणूला हरवूया.
=======================================
प्रतिबंध जरी उपाय असला तरी त्यासोबत काही प्रमाणात लागणाऱ्या खर्चाची देखील तरतूद केली ली असावी.
उदाहरणार्थ , मेडिक्लेम म्हणजेच आरोग्यविमा हा असावाच त्याला कुठल्याही प्रकारचे पर्याय नाही , ते देखील तितकेच गरजेचे आहे.
" #कोरोना व त्यासारख्या इतर #भयंकर_आजारांपासून आपल्या स्वतः ला व कुटुंबातील इतर सदस्यांना होणाऱ्या #वित्तीय_हानी न होऊ देणे हे देखील आपले एक कर्तव्य च आहे. "
आजच कोरोना च्या खर्चाचा देखील समाविष्ट असलेली पॉलिसी तत्काळ घ्या त्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर वर आजच संपर्क करा.
#आपला_आरोग्य_मित्र ,
उमेश दळवी.
+918369995744
िष्याचा_अचूक_वेध_घेऊ_शकत_नाही_पण_संभाव्य_धोक्यांपासून_आपल्याला_व_आपल्या_कुटुंबाला_संरक्षि त_नक्कीच_करू_शकता.
#तळटिप : वरील माहिती कॉपी व पेस्ट करण्यापेक्षा ती , लाईक व शेअर करा, जेणेकरून ह्या माहिती चा सर्वांना च फायदा होईल.
--------------------------------------------------------------------------
👍 𝗟𝗶𝗸𝗲 ⤴️ 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 🔔 𝗝𝗼𝗶𝗻
(👆🏻 करण्यास विसरू नका 👆🏻)
Click here to claim your Sponsored Listing.