AgriUtopia

AgriUtopia

Share

Introduction of Company-

Our team is working in farming sector from 2006 and consulting farmers for better agricultural practices.We teach farmers how to reduce the effort and cost of farming and generate income in different ways and to make biological inputs to detoxify agriculture. Agri Utopia is established in 2022 to build channel and connect as many farmers as possible. Now we provide consu

03/10/2023

Post-003
Non-toxic farming revolution

मातीला पर्याय काय असेल...?

शेकडो वर्षांनी पृथ्वीवर उल्का येऊन आपटणार, बर्फ वितळून समुद्राची पाण्याची पातळी वाढणार वगैरे वगैरे अनेक कारणे पृथ्वी किंवा पृथ्वीवरची मानवी प्रजात नष्ट होण्याची आपण ऐकतो. आपण हे रिल्स/पोस्ट गांभीर्याने घेत नाही आणि घेऊ पण नये. आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्या आणि जगण्याचे संघर्ष एवढे आहेत की आपण अस्तित्वात नसताना होणाऱ्या गोष्टींचा किंवा त्रासाचा विचार आत्ता करणे गरजेचे नाही.

पण आपल्या विनाशाचे खरे कारण आपल्यापर्यंत आलेले नाही. आपण जिवंत असताना आपण कोणत्या गोष्टीचा त्रास ह्याची देही ह्याची डोळा बघणार आहे तर तो म्हणजे आपल्या जमीनी नापीक होण्याचा.

आपल्याकडे जास्तीत जास्त चाळीस वर्षे आहेत जोपर्यंत आपल्याला मातीमधून काहीतरी मिळेल, ते खाण्यायोग्य असेल की नाही हा वेगळा मुद्दा आहे. दुर्दैवाने जर तुम्ही मिडल क्लास असाल किंवा समोरच्याकडून हिसकावून घेण्याचे मानसिक व शारीरिक ताकद नसेल तर आपल्याकडे पंधरा वर्षे आहेत. हि वर्ष कमीजास्त का आहेत हे सविस्तर काल्पनिक कथांमधून लिहिले आहे, जे खरे होऊ नये अशी इच्छा आहे.
डिझर्टिफिकेशन ही प्रोसेस काही वर्षांपासून सुरू आहे. आता जवळपास ३३% जमीन नापीक झाली आहे. दहा सेंटिमीटर सुपीक माती तयार होण्यासाठी दोन हजार वर्षे कालावधी लागतो. त्यामुळे डिमांड सप्लाय जवळपास पण नाही आहे.

माती हि एक नॉन रिन्यूएबल नैसर्गिक स्त्रोत आहे. ती एक जिवंत गोष्ट आहे आणि स्वतःहून मरत नाही. आपण तिला मारून टाकत आहे. ती कोणत्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही. जेव्हा माती नापीक होईल तेव्हा आपल्या मूलभूत गरजांपैकी एक 'अन्न' ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे प्लॅन बी काही आहे काय??
- ओंकार कामत
7387349075

02/10/2023

Post-002
Non-toxic farming revolution
गेले दोन वर्ष एक गोष्ट खूप ठिकाणी निदर्शनास आली. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या पिकवतात आणि बाजारात विकण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या पिकवतात. यामागे त्यांची कारणे वेगवेगळी आहेत, ती बरोबर आहेत की नाही हे माहिती नाही पण त्यांना चूक म्हणता येणार नाही. हे असं का करता असं त्यांना विचारल्यास त्यांचे उत्तर असं होतं की, 'हे असलं विष आपल्या लेकरा बाळांना खायला घालायचं काय?'...
एका गावांमध्ये तर ऐरणीच्या देवाचा साक्षात्कार झाला. केमिकल खते विकणाऱ्या विक्रेता एका सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून घरी लागणारा भाजीपाला घेत होता. त्यांना विचारलं असता त्यांचे उत्तर होते की, 'हा व्यवसाय आहे. पण कुटुंब म्हणून काही जबाबदारी आहे की नाही. सगळं माहिती असून परत तेच खायचं होय'.
आता कुटुंब म्हणून त्यांची जबाबदारी आहे, तशी आपली पण आहे. ज्यांची शेती नाही, शेतीशी काही संबंध नाही, जवळच्या मंडईमध्ये जाऊन खरेदी करणे याशिवाय कोणताही पर्याय नाही, अशी लोके विषमुक्त अन्न डिझर्व करत नाहीत का??
मला असं वाटतं, प्रत्येक जातीचा, धर्माचा, पक्षाचा;
अगदी पैशाने गरीब असलेला गरीब, पैशाने गरीब असलेला श्रीमंत, पैशाने श्रीमंत असलेला गरीब, पैशाने श्रीमंत असलेला श्रीमंत सर्वजण विषमुक्त अन्न डिझर्व करतात.
मग डिझर्व करतात तर ते देणार कोण..
हरितक्रांती ह्यावर सविस्तर गप्पा होतील पण त्यावेळी आपण एक वेळ मारून जायचे म्हणून पुढे गेलो. 'लोक उपाशी मरण्यापेक्षा आजारी पडून मेलेली बरी' हा प्रकार सुरु झाला पण थांबला नाही आणि आता वेळ निघून गेली. अराजकीय पोस्ट आहे म्हणून कुणावरही टीका नाही. पण कोणतेही सरकार यावरती काहीही करू शकत नाही. कारणे खूप व्यापक आहेत, रिस्क खूप मोठी आहे आणि श्रीलंकेचे उदाहरण समोर आहे.
जे काही करायचे आहे, ते तुम्हाला मला आणि आपल्याला करायचे आहे.
आपण करू शकतो...
(जेव्हा मुद्दा व्हॅलिड वाटेल आणि जे काही करत आहे त्यामागील उद्दिष्ट व हेतू प्रामाणिक आहे असे वाटेल तेव्हा संपर्क करा...... सोबत पुढे जाऊ)
- ओंकार कामत
7387349075

Want your business to be the top-listed Finance Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Gokul Shirgaon MIDC
Kolhapur
416234