Mrs.Manishatai R Tope FC
01/01/2024
Rajesh Tope
04/10/2023
Rajesh Tope _ #भैय्यासाहेब यांनी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आतापर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात अनेक निष्पाप लहान बालके आहेत तसेच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आतापर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची व नातेवाईकांना भेट घेतली. रुग्णालयाचे डीन डॉ.राठोड यांच्याशी घडलेल्या घटनेबद्दल चर्चा केली.
शासकीय रुग्णालयात येणारे रुग्ण हे गरीब कुटुंबातील असल्याने ते खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेऊ शकत नाहीत. म्हणून ते शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात.गेल्या एक वर्षापासून वैद्यकीय औषधाचा व साहित्याचा पुरवठा करणाऱ्या वितरण कंत्राटदाराचे थकीत देयके न दिल्याने औषध उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी व इतर वैद्यकीय साहित्य आणावे लागत आहे.
रुग्णालयामधील वर्ग 1,वर्ग 2 च्या मोठया जागा रिक्त आहेत तसेच वर्ग 3 व वर्ग 4 च्या वैद्यकीय,तांत्रिक विविध पदासह वैद्यकीय अधिकाऱ्याचे अनेक पदे रिक्त आहेत.सदरील पदे भरणे बाबत शासनाने तात्काळ पावले उचलावीत.केवळ औषधांच्या तुटवड्यामुळे व रिक्त जागांमुळे अशा घटना घडून निष्पाप गोर गरीब रुग्णाचे बळी जाणे हे दुर्दैवी आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे,राज्यामध्ये गोर गरीब रुग्णाच्या बाबतीत चाललेला जीवघेणा प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्री यांनीव दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अधिक लक्ष द्यावे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
431203